उरणमध्ये घुमला बम, बम भोलेचा गजर

तालुक्यातील 12 मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
। उरण । वार्ताहर ।
कोरोना नंतर दोन वर्षांनी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे उरणमध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. उरण मधील जागतिक वारसा आसलेल्या घारापुरीत देखील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात आपआपल्या कुटुंबासह गर्दी केली होती. उरण तालुक्यात पुरातन शिवलिंगांची बारा मंदिरे असून याही मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने याही वर्षी मंदिर परिसरात हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, कळंबुसरे, पिरकोन, आवरे, खोपटा, शेवा, उरण देऊलवाडी, उरण बोरी, केगाव, कोटनाका, सोनारी या ठिकाणी पुरातन शिवलिंगांची जागृत मंदिरे आहेत. याही शिवाच्या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.

Exit mobile version