। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूर जिल्ह्यातील कन्हान-कांद्री येथे होळीसाठी लाकडं आणायला गेलेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोनू कश्यप असे मत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांद्री परिसरातील काही मुलं होळीसाठी लाकडं आणायला जवाहरलाल नेहरू रुग्णालय परिसरात गेली होती. त्यांच्यासोबत सोनूही गेला होता. यावेळी लाकडाचे ओझे उचलताना तोल गेला आणि सर्व लाकडं त्याच्या अंगावर पडली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवाहरलाल नेहरु रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.