घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हटविला जात नसल्याने
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील गुंडगे गावातील डम्पिंग ग्राऊंड हटवण्यासंदर्भात घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत नगरपरिषदेवर मोर्चा काढला होता. त्याचबरोबर वेळोवेळी त्यांना निवेदन दिले आहे; परंतु तरीदेखील कर्जत नगरपरिषद याकडे लक्ष देत नसल्याने आम्हाला हा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे. म्हणून आम्ही गुंडगे परिसरातील पंचशील नगर, संत रोहिदास नगरमधील रहिवासी येणार्या लोकसभेच्या निवडणुकीवर जाहीर बहिष्कार घालत आहोत, असे समिती अध्यक्ष महेंद्र कानिटकर यांनी जाहीर केले आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीत गुंडगे गावाच्या हद्दीत पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. या प्रकल्पातून दुर्गंधी पसरत असून सायंकाळ पासून रात्रभर वार्यासोबत येणार्या कोंदट वासामुळे गुंडगे गांव, पंचशिल नगर, संत रोहिदास नगर, परिसरातील रहिवाशी यांना श्वसनाचे आजार जडले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प हटविण्यात यावा अशी मागणी साततयाने केली जात आहे. मात्र नगरपरिषद कडून कोणत्याही प्रकारचे कार्यवाहजी केली जात नाही आणि त्यामुळे घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदनदेण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गुंडगे गावालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा त्रास होत आहे. दुसरीकडे परिसरात रोगराई पसरली आहे, अनेकांना श्वसनाचे त्रास होवू लागले आहेत. त्याचवेळी प्रकल्प मधील वेगवेगळ्या उपक्रम यातून निघणारे केमुईकल युक्त पाणी यामुळे शेतकर्यांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत तसेच या दुर्गंधीमुळे परिसरातील विकास खुंटला आहे.

तरीही कर्जत नगर परिषदेला जाग येत नाही. परिसरातील डम्पिंग ग्राउंड पर्यायी जागेवर हालवण्यात यावे या करीता आम्ही कर्जत नगरपरिषवर आक्रोश मोर्चा काढला होता. त्यांच्या बरोबर आम्ही कर्जत नगरपरिषदे बरोबर सतत पत्रव्यवहार देखिल केला आहे. सदरचे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असल्याने गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिकांनी आगामी होणार्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (दि.13) मे होणार्या मावळ लोकसभा मतदारसंघातही मतदान होत असून गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिक मतदान करणार नाही. या सर्व प्रक्रियेला कर्जत नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार आहे.
त्याचवेळी समितीच्या वतीने गुंडगे येथील सर्व्हे नं. 60 मधील शासकीय जागेतील डम्पिंग ग्राउंड हटविण्यात यावे. डम्पिंग ग्राउंड मधून दररोज दुर्गंधी सुटत आहे. ती तात्काळ थांबविण्याची व्यवस्था करावी. डम्पिंग ग्राउंडमुळे या परिसरात मच्छरांचे प्रमाण खूप वाढले असून तात्काळ उपयोजना करावी. डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी नव्याने सुरु असलेला स्नेक पार्क आणि सायन्स पार्क या प्रकल्पासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आहे. मात्र आमच्या परिसरातील रस्ते, गटारे तसेच इतर सुविधांसाठी आपल्याकडे फंड उपलब्ध नाही. म्हणून हा प्रकल्प स्थानिकांच्या हिताचा नसून हा प्रकल्प ताबडतोब बंद करण्यात यावा. डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात कर्जत शहरातील बायोगॅस सारखा प्रकल्प आणू नये. डम्पिंग ग्राउंडमुळे शेतकर्याच्य शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्याचा मोबदला शेतकर्यांना देण्यात यावा आणि कर्जत शहरातील मोकाट कुत्र्याचे लसीकरण सेंटर डपिंग ग्राउंडवर किंवा आमच्या परिसरात आणू नये या मागण्या समिती कडून करण्यात आल्या आहेत.







