• Login
Thursday, October 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

राजिप शाळा हटाळेच्या विद्यार्थ्यांचा रायगडात डंका

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 21, 2026
in अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
राजिप शाळा हटाळेच्या विद्यार्थ्यांचा रायगडात डंका
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तीन विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ भेटीसाठी निवड जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला विज्ञानाची जोड, जिद्दीला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आणि स्वप्नांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर हे विद्यार्थीही अंतराळाला गवसणी घालू शकतात, याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील हटाळे येथील विद्यार्थ्यांनी घडवून आणला आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव केंद्रांतर्गत असलेल्या राजिप उच्च प्राथमिक शाळा, हटाळे येथील तीन विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राला भेट देण्यासाठी निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे हटाळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत नवा अध्याय जोडला गेला असून, जिल्ह्यातील राजिप शाळांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, रामेश्वरम यांच्या वतीने पुणे येथे आयोजित ‘कलाम स्टीम 2026’ या उपक्रमात हटाळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित यांच्या एकत्रित शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, कल्पकता आणि नव संशोधनाची आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत शाळेतील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी प्राप्त झाली त्यात नवनाथ भगत इयत्ता सहावी, दक्ष नाईक इयत्ता सहावी, विराज दिवटे इयत्ता पाचवी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे हटाळे गावासह खारनागाव, चौल चुने कोळीवाडा, नागाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक संस्थेची प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मिळणे, ही त्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत प्रेरणादायी घटना ठरणार आहे.

हटाळे शाळेचे हे यश एका दिवसात मिळालेले नाही. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शाळेत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची ही फलश्रुती आहे. शाळेत उभारण्यात आलेले फिरते तारांगण, साडेनऊ फूट उंचीचे रॉकेट प्रतिरूप, विज्ञान व तंत्रज्ञानाधारित प्रयोग, तसेच अंतराळविषयक विविध शैक्षणिक उपक्रम यांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात विश्वाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

ग्रह, तारे, ग्रहांच्या कक्षा, उपग्रह, ग्रहणे आणि अंतराळ संशोधन यांसारख्या संकल्पना केवळ पाठ्यपुस्तकांपुरत्या मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देण्याचा प्रयत्न शाळेत केला जातो. अंतराळातील घडामोडी आणि रॉकेट प्रक्षेपण यांविषयी विद्यार्थ्यांना शाळेतच माहिती व दृश्य अनुभव मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ‘एक दिवस आपणही इस्रोला जाऊ, अंतराळ संशोधन जवळून पाहू’ हे विद्यार्थ्यांनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संदीप वारगे यांच्या विज्ञाननिष्ठ, प्रयोगशील आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनामुळे हटाळे शाळेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत यश मिळविण्यासाठी तयार न करता त्यांच्यामध्ये जिज्ञासा, चिकित्सक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

विद्यार्थ्यांचे पालक संतोष नाईक, महेंद्र भगत आणि संजय दिवटे यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक डॉ. संदीप वारगे, सीमा नागावकर आणि विजया माळी यांच्या योगदानाचेही कौतुक होत आहे. पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी कृष्णा पिंगळा आणि शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राजिप शाळांच्या गुणवत्तेचा प्रेरणादायी आदर्श
आजच्या स्पर्धात्मक युगात अत्याधुनिक सुविधा केवळ मोठ्या शहरांतील शाळांपुरत्याच मर्यादित राहू नयेत, तर ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यालाही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगाची दारे खुली व्हावीत, या भूमिकेतून हटाळे शाळेची वाटचाल सुरू आहे. मर्यादित साधनसामग्रीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचविता येते, हे या यशाने सिद्ध केले आहे.
सर्व स्तरांतून अभिनंदन
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा समृद्धी संतोष नाईक, ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमींनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related

Tags: alibag newsHataleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadschool newssocial media newssocial newsZilla Parishad School
Previous Post

रायगडात फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया

Next Post

श्रीवर्धन-दिघी बसमार्गात बदल

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

शाळेचा स्लॅब कोसळून विद्यार्थिनी जखमी

October 22, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य धोक्यात

October 22, 2026
sliderhome

एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

October 22, 2026
sliderhome

मतदारांना ओळखपत्राची प्रतिक्षा

October 22, 2026
दत्तात्रय सावंत यांना शेकापचा पाठिंबा
sliderhome

दत्तात्रय सावंत यांना शेकापचा पाठिंबा

October 22, 2026
सरकारी कार्यालयांत कर्मचारी गायब
sliderhome

सरकारी कार्यालयांत कर्मचारी गायब

October 22, 2026
Next Post
श्रीवर्धन-दिघी बसमार्गात बदल

श्रीवर्धन-दिघी बसमार्गात बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?