ब्रेकिंग; तळा येथे भिंत कोसळून ८ वर्षीय मुलीचा मृत्यू ; तीनजण जखमी

। तळा । प्रतिनिधी ।
तळा तालुक्यातील चरई आदिवासी वाडी येथे भिंत कोसळून आठ वर्षांची मुलगी मृत पावली असून तीनजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की चरई आदिवासी वाडी येथे रहात असलेल्या सुनिता अशोक मुकणे या आपल्या चार मुलांसह घरी झोपल्या असताना सकाळी ४.१५ च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने त्या जाग्या झाल्या. घराच्या मागच्या बाजूची भिंत कोसळून त्याखाली सुवर्णा मुकणे, संतोष मुकणे, तन्वी मुकणे, तुषार मुकणे असे चारजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे त्यांनी पाहिले. तात्काळ त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकूनच शेजारी रहात असलेले ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले व त्यांनी ढिगारा बाजूला करून सर्व जखमींना बाहेर काढले. डॉक्टरांनी गंभीर जखमी झालेली सुवर्णा अशोक मुकणे वय वर्षे ८ ही मृत झाल्याचे सांगितले तसेच ईतर जखमी झालेले संतोष मुकणे, तन्वी मुकणे, तुषार मुकणे यांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात येथे हलविण्यात आले आहे.

.

Exit mobile version