महत्वाची बातमी! पी.एफ.आय विरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

। नवी दिल्ली । वृत्त संस्था ।

पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पी.एफ.आय ही संघटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत होती. पीएफआय विरुद्ध राष्ट्रीय यंत्रणा अर्थात एन.आय.एने पुन्हा धडक कारवाही केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित एकूण १५० हुन अधिक जणांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली आहे.

अखेर या संघटनेवर आता पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारले होते.

Exit mobile version