। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील क्षात्रैक्य समाज कुरुळ-अलिबाग संस्थेचा 24 वा वर्धापन दिन रविवारी (दि.5) सकाळी दहा वाजता साजरा करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांनी कळविले आहे.
पहिल्या सत्रात क्षात्रैक्य समाज कुरुळ-अलिबाग संस्थेचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून वामन पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून बोरीवलीमधील उद्योजक प्रकाश पाटील असणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती कृषीभूषण जयंतराव चौधरी व डॉ. रामदास माळी यांची राहणार आहे.
द्वितीय सत्रामध्ये वधूवर परिचय मेळावा होणार आहे. अॅड. समाधान पाटील, राकेश पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.