| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यासह राज्यभरात उत्तरेकडील वार्यामुळे चांगलाच गारठा वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु झाली असून अनेक भागात किमान तापमानात घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार असून, तापमान 1 ते 3 अंशांनी खाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात पहाटे पारा 20 अंशांवर आल्याने रायगडकर गारठले आहेत. आधीच रायगडकर थंडीचा आनंद घेत असताना काही दिवसांपूर्वी थंडी कमी झाली होती. मात्र, पुन्हा बदलेल्या वातावरणामुळे थंडीचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात वाढलेल्या थंडीने रायगडकरांना हुडहुडी भरली असून, ते शेकोट्यांचा आधार घेत असल्याचे चित्र सर्व पहावयास मिळत आहे.