शिहू बेणसेतील पाच खेळाडूंची चमकदार कामगिरी

राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेकरिता निवड
। पाली/बेणसे । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील शिहू बेणसे विभागातील खेळाडू उरी जिद्ध बाळगून कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण सरावातून राष्ट्रीय स्थरावर सक्षमपणे नेतृत्व करण्यास सज्ज झालेत. शिहू बेणसे विभागातील पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असून त्यांची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेकरिता निवड झाल्याने या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने 47 वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा दिनांक 19 ते 23 ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने डेक्कन जिमखाना जलतरण तलाव पुणे येथे खुली निवड चाचणी घेण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये रिलायन्स फाउंडेशन च्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे हेल्थ क्लबमधील जलतरण तलावाचे जलतरणपटू भारत चंद्रकांत कुथे, ओंकार अनंत माळी, साहिल सुरेश कुथे, सार्थक मारुती इन्द्रे, प्रेषिता तरे या पाच खेळाडूंची वॉटर पोलो प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. हे खेळाडू जलतरण क्षेत्रात अपार मेहनत घेत उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. त्यांच्या या उत्तुंग यशाने बेणसे झोतिरपाडा विभागासह जिल्ह्याचे नावलौकीकात भर पडत आहे.

Exit mobile version