। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण पूर्व विभागातील दहागाव विभाग पिरकोन येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयतील कृ. द. जोशी सभागृहात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी. कर्मवीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी प्रीतम म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डी. बी.पाटील, रायगडचे विभागीय अधिकारी एम. के. कोंगरे, रायगडचे सहाय्यक विभागीय अधिकारी व्ही. यू. जगताप, रायगड भूषण ए. डी.पाटील, उद्योजक मयुर भोईर, पिरकोनच्या सरपंच कलावती पाटील , रमाकांत जोशी, सारडे सरपंच रोशन पाटील, चेअरमेन जीवन गावंड , प्राचार्य एस. एम बल्लाळ आर . के .म्हात्रे , आवारे गाव अध्यक्ष संजय गावंड, रायगड भूषण विलास म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचारात प्रेरणा होती. कर्मवीर आण्णांनी कमवा आणि शिका अशी शिकवण दिली. आणि शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात आणली. रयतेचा राजा म्हणून कर्मवीर अण्णांचा उल्लेख करणे वावगे ठरणार नाही.अशा या महान शिक्षण महर्षीचे आपण सर्वांनी स्मरण करणे ही काळाची गरज आहे. असे सांगून, दहा गाव विभागातील पिराकोन या विद्यालयाच्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सध्या या विद्यालयासाठी 5 संगणक देऊ केले आहेत. शिक्षण क्षेत्रात कोणतेही राजकारण न आणता या विद्यालयाला भौतिक सुविधा प्राप्त होण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे सांगून, प्रीतम म्हात्रे यांनी विद्यालयाच्या प्रांगणाच्या भरावासाठी लागणार्या मातीचा माझ्याकडून बंदोबस्त केला जाईल. असेही अभिवचन दिले. यावेळी एम.के. कोंगरे व व्ही. यु.जगताप यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमात जीवन गावंड, डी.बी.पाटील, ए. डी. पाटील आदींची भाषणे झाली.