भारताच्या इशार्‍यानंतर ब्रिटन आले ताळ्यावर

Coronavirus Vaccine bottle Corona Virus COVID-19 Covid vaccines panoramic bottles

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताच्या इशार्‍यानंतर ब्रिटनने पुन्हा आपले लस धोरण बदलले आहे. ब्रिटनने आता आपल्या नवीन प्रवास नियमांमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोरोना लस मकोव्हिशिल्डफ मंजूर केली आहे.

मात्र, यूकेला जाणार्‍या भारतीयांना अजूनही अलग ठेवणे आवश्यक आहे. कारण त्यांनी भारताच्या लसीचे प्रमाणपत्र मंजूर केलेले नाही. यापूर्वी भारताने ब्रिटनला लस धोरणात बदल करण्याचा इशारा दिला होता. लसीच्या नियमांबाबत ब्रिटनच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे लिहिले आहे की, अ‍ॅस्ट्राझेनेका कोव्हिशिल्ड, अ‍ॅस्ट्राझेनेका वजेवरिया आणि मॉडर्ना टकीडाच्या फॉर्मुलेशनला मान्यता देण्यात आली आहे. महत्वाचे गोष्ट म्हणजे कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेणार्‍या प्रवाशांना अजूनही 10 दिवस अलग ठेवणे आवश्यक आहे.

Exit mobile version