झायकॉव्ह-डीचे 1 कोटी डोसची खरेदी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारने अहमदाबादच्या झायडस कॅडिलिया या कंपनीच्या झायकॉव्ह डी या तीन डोसच्या लसीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच या महिन्यात होणार्या राष्ट्रीय कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश करण्यात येणार आहे. अधिकृत सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली.
देशातील लसीकरण कार्यक्रमात विकसित जगातील पहिली लसीचा समावेश करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरवातीच्या पावलांना हिरवा झेंडा दाखवला आहे. सुरवातीला प्रौढांना ही लस देण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
झायकॉव्ह डी 12 वर्षांची मुले किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी भारताच्या औषध नियामकाने मंजूर केलेली पहिली लस आहे. केंद्राने या लसीच्या एक कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. एका डोसची किंमत कर वगळून सुमारे 358 रुपये आहे, अशी माहिती एका अधिकृत सूत्राने दिली.
मजेट अॅप्लिकेटरफची किंमत 93 रुपये. याचाही या लसीच्या किंमतीत समावेश आहे. याच्या मदतीने लसीचा डोस दिला जाणार आहे. मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे सुरवातीला प्रौढांनाच ही लस दिली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.