राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धा; खालापूरच्या दिनेशला कांस्य

| खोपोली | प्रतिनिधी |

राष्ट्रीय क्लासिक आणि इक्विप बेंच प्रेस स्पर्धा नुकतीच बंगळुरू येथे पार पडली. तर या स्पर्धेत खालापुर तालुक्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप पडली असता मास्टर स्पर्धेत 74 किलो वजनी गटात खालापुर तालुक्यातील महड गावामधील आंतरराष्ट्रीय पदक विजेते मास्टर खेळाडू दिनेश पवार यांनी कांस्यपदक पटकावल्याने दिनेश पवारवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

तर त्याचबरोबर खुल्या गटातील स्पर्धेत 74 किलो वजनी गटात महाराष्ट्र राज्य संघातर्फे खोपोलीतील आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू अक्षय शनमूगम यांनी सुवर्णपदक पटकावला असून या विजेत्या खेळाडूंना राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य केल्याने विजेत्या खेळाडूंनी त्यांचे आभार मानलेत. त्याचबरोबर रायगड पॉवर लिफ्टिंगचे सेक्रेटरी अरुण पाटकर सर यांनी पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडच्या वतीने कांस्यपदक विजेते दिनेश पवार व सुवर्णपदक विजेते अक्षय शनमूगम यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version