। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
शहरातील राजीवडा मच्छिमार्केट येथे तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या परिसरात एकाला हॉकी स्टिकने तसेच लोखंडी रॉडने चौघांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना बुधवारी (दि.27) सायंकाळी घडली आहे.
अमीर मुजावर (40), मुजफ्फर मुजावर (30), फैजान फणसोपकर (23), जमीर मुजावर (36) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जखमी तरुणाच्या पत्नीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयितांनी जखमी तरूण अब्दुल इकबाल वस्ता याच्या घरात घुसून त्याच्यासह त्याच्या पत्नीला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राजीवडा मच्छिमार्केट येथे अब्दुल वस्ताची दुचाकी अडवून त्याना दुचाकीवरुन खाली ओढून हॉकी स्टिकने तसेच लोखंडी रॉडने पायांवर, डोक्यावर आणि पाठीवरती मारुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.