खांदा कॉलनीत बुद्ध पौर्णिमा साजरी

| पनवेल | वार्ताहर |

खांदा कॉलनीतील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 741 यांच्यावतीने तक्षशिला बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. या निमित्ताने किशोर कामत यांनी दिलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची भंते अश्‍वमेध यांच्या हस्ते विहारात स्थापना करण्यात आली. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने विहारात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी बुद्धांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खांदा कॉलनीतील उपासक, उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 741 चे अध्यक्ष नथुराम साखरे, उपाध्यक्ष भगवान कांबळे, सचिव अभिजीत जाधव, खजिनदार जिनावस कदम, माजी अध्यक्ष सुभाष धोत्रे, अंकुश मोहिते, भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र बावस्कर, डॉ. सुशील सकपाळ, हरिभाऊ पवार, पुष्पा जाधव, सुवर्ण साखरे आदींनी मेहनत घेतली.,यावेळी डॉ. सुशीम सकपाळ व संगीता सकपाळ यांनी खीरदान केले.

Exit mobile version