। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोटारगाड्या स्वस्त होणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. ज्याचा थेट फायदा सामान्य माणसाच्या खिशात होईल आणि देशातील उत्पादन क्षमता वाढवता येईल. इलेक्ट्रिक वाहनांबाबत सरकारचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती रास्त ठेवून बहुतांश ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
नव्या वाहनांच्या बदल्यात जुन्या वाहनांची भंगाराच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जाईल. याचा सर्वात मोठा फायदा प्रदूषण कमी करण्यात होणार आहे. जुन्या वाहनांच्या बदल्यात नवी इलेक्ट्रिक वाहनं मिळणार. वाहने बदलणे, प्रदूषण वाढवणारी वाहने बदलणे किंवा करणे हरित वातावरणासाठी आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरणासंबंधित राज्याला मदत केली जाईल, जेणेकरून जुनी वाहने बदलता येतील. जुन्या रुग्णवाहिकाही बदलण्यात येणार असून, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.