इमारतींचा पुनर्विकास प्रशिक्षण

| उरण | वार्ताहर |
उरण तालुका सहकारी गृहनिर्माण महासंघ व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथे तेरपंथी सभागृहात इमारतींचा पुनर्विकास संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास उरणकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. श्रीप्रसाद परब यांनी इमारतींचा पुनर्विकास संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सहायक निबंधक राजेंद्र गायकवाड व नवी मुंबई हौसिंग फेडरेशनचे सचिव भास्कर म्हात्रे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार महासंघाचे संचालक दामोदर केणी, तर सूत्रसंचालन सचिव वाघ यांनी केले. यावेळी संचालक महेंद्र कुडतरकर, धनाजी पाटील, जगदीश पाटील, सभासद संस्था व उरणमधील गृहनिर्माण संस्थांमधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version