| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील मच्छीमार कोळी बांधवांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून मोरा मत्स्य व्यावसायिक सहकारी सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. या मच्छीमार सोसायटीच्या चेअरमनपदी राकेश कोळी, व्हाईस चेअरमनपदी कल्पना मोरेकर तर सेक्रेटरीपदी नारायण कोळी यांची निवड करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अलिबागचे रविंद्र पाटील यांनी मोरा येथील सोसायटीच्या कार्यालयात येऊन सर्व सभासदांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.