बुली बाईचा खरा मास्टरमाईंड आसाममध्ये

दिल्ली पोलीसांनी केली अटक
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बुली बाई मोबाईल अ‍ॅप प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुली बाई अ‍ॅपवरून मोठा गदारोळ सुरू आहे.
मुस्लीम महिलांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून त्यांची छायाचित्रे घेऊन ती बुली बाई या मोबाईल अ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर टाकून अपलोड करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. हा प्रकार 1 जानेवारीला उघड झाल्यानंतर त्यासंदर्भात आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघांचं वय 18 ते 21 वर्षाच्या दरम्यान आहे.
या तिघांना मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केल्यानंतर आता दिल्ली पोलीस देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला आसाममधून अटक करण्यात आली आहे. हाच तरुण या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती डीएसपी केपीएस मल्होत्रा यांनी एएनआयला दिली आहे.
बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ या स्पेशल सेलनं आसाममधून अटक केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. यासंदर्भात या स्पेशल सेलचे डीसीपी केएसपी मल्होत्रा यांनी सविस्तर माहिती दिली.
नीरज मल्होत्रा यानंच गिटहबवर बुली बाई अ‍ॅप तयार केलं आणि तोच या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याला आम्ही आसाममधून अटक केली आहे. या अ‍ॅपचं ट्विटर अकाउंट देखील नीरज बिष्णोईच चालवत होता. त्याला आता दिल्लीला आणलं जात आहे, अशी माहिती मल्होत्रा यांनी दिली आहे.

Exit mobile version