| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल बंद असलेल्या घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये आणि दीड किलो चांदीचे भांडे असा 1 लाख 35 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 19 येथे राहणारे चिन्मय खोबरे हे त्यांच्या घराच्या दरवाजाला लॉक लावून कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्या घरात प्रवेश करून 1 लाख 35 हजारांचा ऐवज चोरुन नेला. चिन्मय हे संध्याकाळी घरी परत आले असता त्यांना घराचा लोखंडी गेट उघडा असल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, त्यांच्या घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले. या प्रकरणी चिन्मय यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.