। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यात सध्या सातत्याने घरफोडीचे प्रकार सुरू असताना आता पुन्हा एकदा चोंढी येथे आणखी 1 घरफोडीची घटना घडली आहे. दि.5 ते 6 नोव्हेंबर च्या दरम्यान मु.पो.वेलणकर वाडी, शिवशक्ती चोंढीनाका घर नं.555 , अलिबाग येथे राहणारे फिर्यादी व त्यांची आई हे घराते झोपले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराच्या मागील लोखंडी दरवाजाची कडी काढुन व आतील लाकडी दरवाजा ढकलुन घरात प्रवेश केला व 75 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरून नेली आहे. याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास मपोसई/श्रीमती.मोहिते हे करीत आहेत.