| अलिबाग | प्रतिनिधी |
घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्याने 33 हजार 550 रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना आवास येथील वसाहत पाडा येथे 10 ते 11 जूलैच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळ भगत यांचे घर दहा जूलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडे होते. या संधीचा फायदा घेत चोरटा घरात घुसला. लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून लॉकरमधून 33 हजार 550 रुपयांची रोख रक्कम लंपास केली. भगत हे कपाट उघण्यासाठी गेले असता, कपाटातील लॉकरमधील रोकड लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामध्ये 500 रुपयांच्या 64 नोटा, 200 रुपयांच्या सात नोटा, 100 रुपयांची एक नोट व 50 रुपयांची एक नोट असा एकूण 33 हजार 550 रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. मांडवा सागरी पोलीस ठाण्यात घरफोडी प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार राकेश म्हात्रे अधिक तपास करीत आहेत.