2.54 लाखांचा ऐवज लंपास
| पेण | प्रतिनिधी |
पेण पोलीस ठाणे हद्दीतील दुष्मी गावात 17 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना घडली. आरोपीने घराच्या मुख्य दरवाजाचा लॉक तोडून आत प्रवेश केला व आत जाऊन दुसरा लॉक लावून घरफोडी केली. घरातील सोन्याचे दागिने तसेच किचनमध्ये ठेवलेली रोख रक्कम व बेडरूममधील पैसे असा एकूण 2 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.







