उलवे येथे घरफोडी

। पनवेल । वार्ताहर ।

उलवे येथे 5 लाख 28 हजारांच्या घरफोडीची घटना घडली असून, या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर 18 येथे राहणाऱ्या आनंदसिंग राठोड यांचे घर 15 दिवसांपासून बंद होते. ते परत आले असता घरफोडी झाल्याचे लक्षात आले. चोरट्याने बाल्कनीतून प्रवेश करून 5 लाख 28 हजारांचा ऐवज चोरला आहे. याबाबत त्यांनी उलवे पोलिसांकडे तक्रार करताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उलवे परिसरात सतत चोरीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

Exit mobile version