प्रेम प्रकरणातून जिवंत जाळले

फिर्यादी,आरोपी पुणे जिल्ह्यातील
दोघांवर गुन्हा दाखल
। अलिबाग । वार्ताहार ।
रसायनी परिसरात दि. 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान दोन आरोपींनी पुण्यातील एका व्यक्तीला टेम्पोसह जाळून खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेतील आरोपी आणि फिर्यादी हे पुणे जिल्ह्यातील आहेत.
प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील रसीकवाडी जांबेरोड येथे राहणार्‍या आरोपीला आपल्या पत्नीचे पुनावळे कोयते वस्ती येथे वास्तवास असणार्‍या फिर्यादीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय होता.त्यावरुन आरोपीने आपल्या पत्नीच्या भावासोबत संगनमत करुन फिर्यादीला त्याच्या टेम्पोसहित आणून रसायनी परिसरात जिवंत जाळले. या घटनेबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या धक्कादायक घटनेचा अधिक तपास पोनि/श्री.डोंगरे हे करीत आहेत.

Exit mobile version