सोमय्या यांचा पुतळ्याचे दहन

| पनवेल । वार्ताहर ।
संजय राऊत यांच्या वरील ईडी कारवाईचा निषेध म्हणून पनवेलमध्ये शिवसेना कार्यालयाजवळ शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली ईडीचा गैरवापर करणार्‍या सोमय्या यांचा निषेध करून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शिरीष घरत, रामदास पाटील, भरत पाटील, दीपक निकम, प्रदीप ठाकूर, रामदास शेवाळे, योगेश तांडेल, गुरुनाथ पाटील, रघुनाथ पाटील, दीपक घरत, कल्पना पाटील, प्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, राकेश गोवारी, यतीन देशमुख, डी.एन.मिश्रा, अवचित राऊत, पराग मोहिते, ज्ञानेश्‍वर भंडारी, अपूर्वा प्रभू यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version