| पाताळगंगा | प्रतिनिधी |
मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी (दि.7) एका महामंडळाच्या बसने समोरील उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात बस मधील ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
मुबंई-पुणे एक्प्रेसवेवरून कराड व मुबंईकडे बस जात असताना ती बोरघाटात आली असता समोर उभ्या असलेल्या टाटा कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडून आला आहे. या अपघातात बस मधील ६ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.