भगवतगीतेतून व्यवसाय योग वेबिनार

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
इस्कॉन युवा परिषदेने भगवतगीतेमधून व्यवसाय योग या विषयावर वेबिनार आयोजित केला आहे. वेबिनारमध्ये एकावेळी सुमारे 2.5 दशलक्ष लोक सहभागी होऊ शकतात. हा वेबिनार रविवारी 20 जून रोजी सकाळी 12 ते 2 आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक दैनिक कृषीवल आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे वेबिनार विनामूल्य असेल आणि लोकांना सहभागाचे प्रमाणपत्रही मिळेल. वैदिक विचारातून भागवत गीतेच्या आधारे व्यवसाय कल्पना शिकण्याची ही एक उत्तम संधी आहे.

या सत्राचे वक्ते डॉक्टर विवेक बिंद्रा आहेत जे या अनोख्या विषयावर बोलतील. नोंदणीकृत सहभागींना ऑनलाइन लिंक देण्यात येईल. नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक आहे- https://iiyc.co.in/?event=SP509 तसेच अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा. 88059 71395, 8888204453.

Exit mobile version