। तळा । प्रतिनिधी ।
तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयात डेलनेट रिसोर्सेस ॲन्ड सर्व्हिस या विषयावर नुकतेच ऑनलाईन वेबिनार पार पडले. हा कार्यक्रम आयक्यूएसी व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारसाठी डेलनेट पुणे येथील सिनियर नेटवर्क असिस्टंट रोहिदास राठोड यांनी मार्गदर्शन करत डेलनेटच्या विविध सेवा, ई-जर्नल्स, ई-बुक्स, इंटर लायब्ररी लोन व डिजिटल डेटाबेसचा प्रभावी वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे पोर्टलचा वापरही दाखवून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भरत चाळके यांनी केले, तर प्रस्तावना व परिचय ग्रंथपाल मनोज वाढवळ यांनी करून दिला. प्राचार्य डॉ. यादव एन. एस. यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत डिजिटल ग्रंथालय सेवांचे महत्त्व अधोरेखित केले. शेवटी प्रा. विजय चव्हाण यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या वेबिनारला प्राध्यापक, विद्यार्थी व ग्रंथालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







