शेतीवर परिणाम, भात लागवड ठप्प
| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील माजगांव, आंबिवली, वारद, पौध तसेच या पपिसरातील आदिवासीवाड्यांसाठी तयार करण्यात आलेले कालवे सन 2017 पासून कोरडे पडले आहेत. त्याचा परिणाम परिसरातील शेती व्यवसायावर झाला असून,पाण्याअभावी होणारी भात लागवड पूर्णपणे बंद झाली आहे.
या परिसरात शेकडो हेक्टर आहे. परंतु कालव्याचे पाणी नियोजित वेळेवर पोहचत नसल्यामुळे उन्हाळी भात लागवड करण्यास शेतकरी तयार होत नाहीत. गेल्या सहा ते सात वर्षापासून कालव्याचे पाणी शेतीपर्यंत पोहचले नाही.शिवाय कालव्याची दुरवस्था यामुळे भातपेरणी पासून ते लागवडीपर्यंत पाण्याची खूप आवश्यक असते.मात्र कालव्याची दुरवस्था झाल्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही. सन 2017 मध्ये पाणी सोडले मात्र ते शेवटपर्यंत पोहचेल नाही.यामुळे कालवा दुरुस्त झाल्याशिवाय पाणी पोहचवू शकत नाही ही वस्तु स्थिती आहे.मात्र सन 2018 ते 2022 या वर्षी कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही.कारण अनेक ठिकाणी कालव्याची दुरवस्था निर्माण झाली आहे.
मी उपसरपंच पदावर असतांना पाणी यावे यासाठी मी प्रयत्न करीत होतो.त्यासाठी पाठ बंधारे अधिकारी यांच्याशी चर्चा करून 2016 मध्ये पाणी सुद्धा आले होते.मात्र ते शेवटपर्यंत पोहोचले नाही कालव्याला पाणी शेतीला मिळाल्यास शेतकरी भात शेती करु शकतात.अ माहिती माजगावचे माजी उपसरपंच राजेश पाटील यांनी दिली.
खरसुंडी बंधार्यातून पाणी हे कालव्याला सोडले जावे यासाठी प्लास्टिक पाईपच्या जागी लोखंडी पाईप बसविण्यात आले आहे.शिवाय या कालव्याची दुरवस्था निर्माण झाली आहे.त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. – भारत गुंटुरकर- उप विभागीय अभियंता
सात वर्षापूर्वी कालव्याला पाणी येत असल्यामुळे दरवर्षी भात लागवड होत असे शिवाय गुरांच्या पिण्याच्या प्रश्न,विहिरीला पाणी राहत असे,मात्र पाणी बंद झाल्यामुळे भाताचा दाणा पहावयास मिळत नाही. – रवि काठावले शेतकरी माजगांव