। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी ब्रिजवर पंचमुखी हनुमान मंदीर सिग्नल जवळ ब्रिज उतरत असताना एका कारचालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. पनवेल शहरात राहणारे अतुल पाटणकर हे आपल्या ताब्यातील स्कुटी ने मुळ गावी चिखले, ता. पनवेल येथे जात असताना ते नानासाहेब धर्माधिकारी ब्रिज उतरनीवर शिवशंभो सिग्नलच्या अलीकडे आले असता पाठीमागून येणारी पांढऱ्या रंगाची हुंडई कंपनीची आय 10 गाडीने धडक मारून जखमी केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







