मारहाण करून कारची तोडफोड

। गोरेगाव । वार्ताहर ।
वडवली मार्गे म्हसळा जाणार्‍या कारला म्हैस धडकली. या वादातून एकाने कार चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत वडवली येथे फिर्यादी रा.नवेनगर, ता.म्हसळा हे वडवली मार्गे म्हसळा येथे कार नं.एमएच 04 बीजी 3064 ही घेऊन जात असताना वडवलीजवळ येताच रस्त्याच्या बाजूला चरणार्‍या म्हशीपैंकी एक म्हैस अचानक फिर्यादी यांच्या कारच्या डाव्याबाजूस येऊन धडकल्याने तिला किरकोळ मार लागून फिर्यादी याच्या गाडीचे नुकसान झाले. त्यावेळी तेथे म्हैस मालक आरोपी रा.वडवली हा येऊन त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करून दुखापत केली तसेच कारची काचही फोडली.

Exit mobile version