| खरोशी | वार्ताहर |
पेण तालुक्यातील खरोशी येथे आम्ही खरोशीकर सामाजिक संघटनेच्या वतीने 22 एप्रिल रोजी खरोशी गावातील सर्व विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केळंबा देवीच्या माहेरघरात करण्यात आले होते.
संघटनेचे अध्यक्ष गणपत घरत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक आशिष कुमार केदार (मुंबई), स्मार्ट एज्युकेशन क्लासेसचे प्रा. दिनेश डांगे (पेण), सरपंच रुपाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनंजय घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी घरत यांनी केले.
यावेळी मुख्य मार्गदर्शक आशिष कुमार केदार यांनी सांगितले की, मुलांमधील असलेली गुण कसे ओळखावे, मुलांमधील कौशल्य कसे ओळखावे? मुलांमध्ये अभ्यास करण्याची क्षमता कशी वाढवावी? दहावी बारावीनंतर पुढे काय? करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध असतात यासह विद्यार्थ्यांची आकलन शक्ती, विचार करण्याची प्रवृत्ती, परिश्रम करण्याची वृत्ती, समय सुचकता, सौजन्यशिलता समयसूचकता विद्यार्थ्याच्या आवडीचा कल विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करून उत्तम मार्गदर्शन केले. उपस्थितांचे शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव म्हात्रे गुरुजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुकर पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेक्रेटरी बबन घरत, खजिनदार कैलास ठाकूर, अमरचंद घरत, महेश पाटील, सोपान पाटील, लहू घरत, प्रभाकर घरत, राजेंद्र म्हात्रे, जनार्दन पाटील आदींनी मेहनत घेतली.