केअरटेकरनेच मारला डल्ला

कुरूळ येथील व्हिलामधून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील एका व्हिलामधून सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. केअरटेकरनेच हा डल्ला मारल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हिलामध्ये काही मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या. मात्र केअर टेकरनेच ओला कंपनीची एस-1 प्रो इलेक्ट्रिक मोटारसायकल (किंमत 80 हजार रुपये), डेल कंपनीचा लॅपटॉप (किंमत ३० हजार रुपये) तसेच ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन व चार्जर (किंमत 15 हजार रुपये) असा एकूण एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

Exit mobile version