| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका मृत व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. पुढे त्या मुलीचा त्याने फायदा उचलला. पीडितेच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्याने अल्पवयीन मुलीशी लग्न केले आणि जून ते ऑगस्ट 2024 दरम्यान पीडितेवर अनेकदा अत्याचार केला. त्यानंतर मुलगी गरोदर राहिली आणि 14 फेब्रुवारी रोजी तिने एका मुलाला जन्म देखील दिला. या प्रकरणाची माहिती पीडितेच्या आईने स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पालिसांनी आरोपीच्या विरुद्ध पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला. दरम्यान, आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. असे असूनही एफआयआरमध्ये आरोपीचा मृत्यू झाल्याचे उल्लेख न केल्याने गदारोळ माजल्याचे म्हटले जात आहे.