। ठाणे । प्रतिनिधी ।
अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात एका नाल्याच्या पुलावर कोंबड्या वाहतूक करणारे दोन टेम्पो उभे होते. मात्र, सोमवारी मध्यरात्री अचानक दोन्ही वाहनांनी पेट घेतला.आगीची घटना समजताच वाहन मालक आणि इतर नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. दरम्यान ही आग अचानक लागली की अज्ञाताने लावली याची माहिती समजू शकली नाही.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली.