मनसे महिला पदाधिकार्‍यावर गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल व उरण तालुका महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी असणार्‍या अदिती सोनार यांच्यावर खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात पनवेल तहसील कार्यालयातर्फे फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोनार यांचा बांधकाम व्यवसाय असून, नोव्हेंबर 2020 मध्ये विहीघर गावातील सर्व्हे क्रमांक 145/2 येथील 79 गुंठे क्षेत्रावर गृह प्रकल्पाचे बांधकाम करण्यासाठी घेतलेल्या बिनशेती परवानगीसाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या नावाचे बनावट आदेशपत्र तसेच बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचे महसूल वापर विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे समोर आल्याने संबंधित बांधकाम परवानगीने शासनाची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा शासनातर्फे मंडळ अधिकारी सुरेश मोराळे यांनी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात नोंदविला आहे. अदिती सोनार यांनी वर्षभरापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला होता.

Exit mobile version