जुगार प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

| पनवेल | प्रतिनिधी |

तीन पत्ता जुगार खेळत असताना मिळून आल्या प्रकरणी अयुब इब्राहिम मदार, आहाद असलम पटेल, जाहीर अतीक मुल्ला, मोबीन इस्माईल खामकर, सलीम गुलजार पटेल, सलमान इकबाल पटेल यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मन्नत कॉलनी येथील एका रूमच्या भिंतीच्या आडोशाला तळोजा गाव या ठिकाणी तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपींकडून 57 हजार रुपये हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version