| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिला गर्भपात करण्यास भाग पाडून शिवीगाळ आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी ओमकार वैजनाथ रोडगे, इंदू रोडगे, वैभव रोडगे आणि विद्या रोडगे (सर्व राहणार मुंबई) यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात सात जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच जून ते 22 जून दरम्यान ओमकार रोडगे याने पीडित महिलेसोबत प्रेमाचे नाटक करून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी तिला वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. आरोपी ओमकार रोडगे याने मोबाईलमधील पीडित महिलेचे न्यूड फोटो समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्याची धमकी दिली आणि तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच इंदू रोडगे, वैभव रोडगे, विद्या रोडगे यांनीही पीडित महिलेला शिवीगाळ करून खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.
गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
