अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

। पनवेल । प्रतिनिधी ।

तीन अल्पवयीन मुलींची छेड काढल्या प्रकरणी आरोपी पंकज अजयसिंग सिंग रा. कामोठे सेक्टर 15 याच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सहा वर्षीय, सात वर्षीय आणि नऊ वर्षीय पीडित मुली कामोठे येथे राहत असून, आरोपी पंकज सिंग (28) याने तिन्ही मुलींची छेड काढली. याची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर आरोपी विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version