। पनवेल । प्रतिनिधी ।
पत्नीला शिवीगाळ करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी पतीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे वय 32 असून, आरोपी पती 34 वर्षांचा आहे. 10 सप्टेंबर 2025 पासून दोघे एकत्र राहत असताना पतीने पत्नीला वारंवार शिवीगाळ करून धमक्या दिल्या. तसेच तिच्यासोबत राहायचे नसल्याचे सांगत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.






