सुरक्षा भिंत पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

| पनवेल | प्रतिनिधी ।

दगड व सिमेंटमध्ये बांधलेली सुरक्षा भिंत ही भिती दाखविण्यासाठी पाडल्याने सदर आरोपी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीजितसिंग बाल (75) रा.मानखुर्द यांच्या मालकीच्या हक्काची व ताबेकब्जातील पनवेल येथील चार फुटी उंचीची व 170 फुट लांबीची दगड व सिमेंटमध्ये बांधलेली सुरक्षा भिंत आरोपीने सदर ठिकाणी बेकायदेशीररित्या प्रवेश करून त्यांना भिती दाखविण्यासाठी सदर सुरक्षा भिंत पाडून त्यांचे 4 लाखाचे नुकसान केले म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि सचिन पोवार करीत आहेत.

Exit mobile version