विद्यार्थ्यांसाठी किल्ले बांधणी स्पर्धा

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

मुरूड तालुक्यातील मजगावच्या श्री शिवप्रेमी शिवभक्त मित्र मंडळातर्फे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी दिपावलीच्या सुट्टीत किल्ले गड बांधणी स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले बांधणीची संकल्पना शिवदुर्ग विज्ञान व गडकिल्ल्यांची नाविन्यपूर्ण कल्पना अशी असून स्पर्धकांनी आपली नावे दि.12 नोव्हेंबरपर्यंत नोंदविणे आवश्यक आहे. किल्लेही याच दिवसांपर्यंत स्वतःच्या मालकीच्या जागेत उभारुन पूर्ण करणे आवश्यक आहे. गडकिल्ल्यांची नाविन्यपूर्ण कल्पनेवर आधारित मातीकाम, गवत व अन्य नैसर्गिक साधनांचा वापर सजावटीला प्राधान्य देताना प्लॅस्टिकच्या वापरास मनाई असून किल्ल्यांची उपयुक्तता व त्यातून ऐतिहासिक माहिती मिळाली पाहिजे.

13 ते 16 नोव्हेंबर या दरम्यान परीक्षण केले जाईल. स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम तीन व उत्तेजनार्थ तीन स्पर्धकांना बक्षिसे दिली जाणार असून प्रमुख मान्यवरांच्या पसंती नुसार एक क्रमांक देण्यात येणार आहे. सहभागी मुलींसाठी स्वतंत्र पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धक इयत्ता चौथी ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणारे असावेत. नोंदणी व संपर्कासाठी आशिष बुल्लु 8237275668, नाथाभाऊ गिरणेकर 9225487844, समीर माळी 8237702595, शनिकेत भोईर -8983092048, नितेश कांबळे 8149245358, योगेश घरत 7821021204 असे क्रमांक असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version