नागोठणे लायन्स क्लबतर्फे मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

| नागोठणे | प्रतिनिधी |

लायन्स क्लब नागोठणेतर्फे नुकतेच डोळे तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नागोठणे ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन क्लबचे नवीन सदस्य लायन विनोद सावंत व लायन अंजली सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी कै. गीतादेवी आणि कै. गोविंदरामजी रामदेवजी हलवाई (कै. दुर्गाप्रसादजी मोदी यांची कन्या व जावई) यांच्या स्मरणार्थ सुधीर गोविंद रामजी हलवाई आणि परिवार मुंबई यांच्याकडून आर्थिक सहयोग लाभला.

आर. झुनझुनवाला – शंकरा आय हॉस्पीटल न्यु पनवेल यांचे माध्यमातून संपुर्ण रोहा तालूका मोतिबिंद विरहीत करण्याचे अभियान राबविण्यात आले आहे. लायन्स क्लब नागोठणे तर्फे सातत्य राखत प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या गुरुवारी हा मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ठेवण्यात येत आहे. आत्तापर्यंत 231 मोफत शस्त्रक्रिया झाल्या असून लवकरच 1000 मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण करण्याचा मानस लायन्स क्लब नागोठण्याचे अध्यक्ष लायन अनिल गिते यांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन करताना बोलून दाखविला आहे.

यासाठी सेक्रेटरी लायन विवेक सुभेकर, खजिदार संतोष शहासने, लायन विवेक करडे, लायन विलास चौलकर, लायन सुनिल कुथे, लायन विनोद सावंत, लायन अंजली सावंत याबरोबरच श्री जोगेश्‍वरी पतसंस्थेंच्या संचालिका दिपीका गायकवाड, तसेच ज्यांच्या माध्यमातून हे शिबिर होत आहे ते आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटलचे टिम मॅनेजर प्रकाश पाटील व त्यांची संपुर्ण टिम यांचे या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version