शेकापतर्फे कामोठ्यात महिला दिन साजरा

। पनवेल । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कामोठे येथे शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक शंकर म्हात्रे यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सेक्टर 9 कामोठे या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील सर्व महिलांचा सौभाग्यवतींचे मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शंकर म्हात्रे यांनी सांगितले, की शेतकरी कामगार पक्षात नेहमीच महिलांना सन्मानाने वागवले जाते. त्यांचा आदर ठेवला जातो. यामुळे या भगिनींचा सत्कार करताना मला समाधान मिळत आहे.
या महिला दिनाच्या कार्यक्रमात 78 महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शेकाप महिला कार्यकर्त्या ज्योती शंकर म्हात्रे, महिला अध्यक्षा गीता उंडे, उपाध्यक्षा ताई भोसले, शुभांगी कड, सौ. नागरगोजे, अरुणा बांगर, अरुणा बांगर, हरिश्‍चंद्र पाटील, आंबवणे गुरुजी, चौगल गुरुजी, पाटील, विधाते, साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version