शेकापचा अमृतमहोत्सव घरी साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचा अमृतमहोत्सव दि.2 ऑगस्ट रोजी अनिल ठाकूर यांनी आंबेपूर-पेझारी येथील सुभाषनगरमध्ये त्यांच्या घरीच साजरा केला. सकाळी ठीक 10.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. झेंड्याची रीतसर पूजा करून ‘लाल बावटेकी जय, शेकापक्षाचा विजय असो, आ. जयंत भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ इत्यादी घोषणा देण्यात आल्या.

यावेळी स्मिता पाटील (माजी सरपंच-खिडकी), सतीश पाटील, जगदीश शेळके, प्रियांका ठाकूर, सुजित पाटील, विकास पाटील, प्रभावती ठाकूर, स्मिता पाटील आदी हजर होते. ध्वजारोहणानंतर खाऊ वाटण्यात आला. गेल्या तीन वर्षांची परंपरा अनिल ठाकूर यांनी जपली आहे.

Exit mobile version