दिव्यांग शिक्षकांचा कळंबोलीत सन्मान

। पनवेल । वार्ताहर ।
शारीरिक व्याधींवर मात करत मुलांना घडवणार्‍या दिव्यांग शिक्षकांचा शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी सन्मान केला. या माध्यमातून त्यांनी अनोखा शिक्षक दिन साजरा करत समाजासमोर एक वेगळा वस्तुपाठ ठेवला.

यावेळी देवीचा पाडा येथील मुख्याध्यापक मच्छिंद्र मोहिरे, संजय खटके, सरिता सोनार, दत्तात्रय भोंडकर, संतोष पाटील, अंकुश जाधव, नारायण सावंत यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आ. बाळाराम पाटील, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, कळंबोल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, माजी नगरसेविका विद्या गायकवाड, बांधकाम व्यवसायिक राहुल हजारे, वाहतूकदार दादा तरंगे, एस.एस. पाटील, मंडळाचे खजिनदार शरद कदम, महेश गोडसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version