कोकण मराठी साहित्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा

| श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
कोकण मराठी साहित्य परिषदेचा 31 वा वर्धापन दिन 30 मार्च 2022 रोजी कोमसाप रोहाच्या अध्यक्षा संध्या दिवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे स्वागत करून सदरच्या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचा विषय होता पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे साहित्य प्रास्ताविक दिवकर यांनी केले.रोहयाच्या सुखद राणे, नारायण पानावकर तसेच बाल साहित्यिक स्वराज दिवकर यांनी मधुभाईंच्या जीवनाचा परिचय करून दिला. क्षीरसागर यांनी मधुभाईच्या काही आठवणी सांगताना ते भूतकाळात रमून गेले.निकीता बोथरे,वर्षाराणी मुंगसे , क्षीरसागर, श्‍वेता रिसबुड, सुचेता तटकरे ,राजेंद्र जाधव,संदेश बामणे, अक्षय बामणे, परशुराम धामणसे, विजय दिवकर, हनुमंत शिंदे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या कथा व कविता यांचे वाचन केले.

Exit mobile version