पाणी दिवस साजरा

| उरण । वार्ताहर ।
द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम विद्यालय करंजा येथे जागतिक पाणी दिवस बुधवार (दि.21) दिवस उत्साहात साजरा.या दिवसानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सर्व प्रथम विद्यालयातील सर्व शिक्षकांना भेटकार्ड देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या दिवसानिमित्त गाणी सादर केली. विद्यार्थ्यांनी पाणी दिवसानिमित्त काही घोषवाक्ये लिहून आणली होती.

तसेच विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य- नाटिका सादर केली. विद्यालयात पाणी दिवसानिमित्त प्रश्‍न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लहान मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.आशा यांनी मेहनत घेतली. या उपक्रमाचे सुत्रसंचलन पुर्वांगी म्हात्रे आणि तक्षक भगत या विद्यार्थ्यांनी केले.

Exit mobile version