सी.डी.देशमुख यांची जयंती साजरी

| तळा | वार्ताहर |

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो. म. वेदक विद्यामंदिर, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथे डॉ. सी. डी. देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव मंगेश देशमुख, शाळा समितीचे चेअरमन महेंद्र कजबजे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव मुख्याध्यापक दिलीप ढाकणे सर्व विद्याशाखेचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सी. डी. देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थ्यांनी डॉ सी डी देशमुख यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. नितीन पाटील सर यांनी केले यावेळीसंस्था पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version